मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का?, मिळाले हे उत्तर

Maharashtra Winter Session : राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केली आहे. 

Updated: Dec 22, 2021, 12:40 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का?, मिळाले हे उत्तर title=

मुंबई : Maharashtra Winter Session : राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात झाली असून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आजारी असल्याने ते अधिवेशनाला उपस्थित राहणार का, हा मुद्दा  विरोधकांनी लावून धरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला आहे. यावरुन भाजप आणि शिवसेना आमने-सामने आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'वर्षा'हून काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी उपस्थित राहतील ,अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिली. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन टोला लगावला आहे. 

मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे. मात्र, मुख्यमंत्री पदभार हा दुसऱ्याकडे द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असेल हे स्वाभाविक आहे, कारण पदभार घेतला तर सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पदभार दिला पाहिजे. मात्र, त्यांनी असंही केलेले नाही. त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला लगावला.

 गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात पर्यावरण आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. ते विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल तेव्हा ते विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी दिली.