मोठी बातमी : कुर्ल्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

लोकमान्य टिळक टर्मिनसला पायी जात असताना बलात्कार

Updated: Jan 21, 2020, 01:42 PM IST
मोठी बातमी : कुर्ल्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

मुंबई : कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत महिला रात्री ११च्या सुमारास पायी जात असताना हा बलात्कार करण्यात आला. 

कुर्ला रेल्वे स्थानक येथे उतरून कटने, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसला महिला पायी जात असताना साबळेनगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली. त्याचवेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिध्दार्थ वाघ, श्रीकांत भोगले अशी चार आरोपींची नावं आहेत. 

आरोपी पीडित महिलेकडून ३ हजार रुपये आणि मंगळसुत्र खेचून घेऊन पळून जात होते. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेने १०० क्रमांकावर फोन करत याप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.