इम्रान खानच्या स्वागतासाठी फ्लॅश मॉब

'एक मै और एक तू' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या इम्रान खान बराच बिझी आहे. न्यू यॉर्क विद्यापीठात या सिनेमाच्या प्रमोशनसाठी इम्रान खान गेला तेंव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. इम्रानचे स्वागत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फ्लॅश मॉबने केलं.

Updated: Feb 5, 2012, 11:57 AM IST

www.24taas.com,न्यू यॉर्क

 

'एक मै और एक तू' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या इम्रान खान बराच बिझी आहे. न्यू यॉर्क विद्यापीठात या सिनेमाच्या प्रमोशनसाठी इम्रान खान गेला तेंव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. इम्रानचे स्वागत विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फ्लॅश मॉबने केलं. विद्यापीठातील १०० विद्यार्थ्यांनी 'एक मै और एक तू' तसंच 'आँटीजी' या सिनेमातल्या लोकप्रिया गाण्यांवर ताल धरला.

 

गेली दोन आठवडे विद्यार्थी फ्लॅश मॉबसाठी कसून सराव करत होते. एनवाययु दिल्लगीचा प्रेसिंडेट मोहित छतपार म्ह्णाला की सर्वांना सहजपणे करता येईल अशा साध्यासोप्या स्टेप्सवर आम्ही डान्स बसवला. सर्वांना व्हिडिओ पाठवले आणि आमच्या अपेक्षपेक्षा कितीतरी अधिकपटीने चांगला परफॉर्मन्स झाला. लोकांनी उत्सफूर्तपणे सहभागी झाल्याने फ्लॅश मॉब आणखीनच रंगतदार झाल्याचं छतपारने सांगितलं. इम्रान खाननेही परफॉर्मन्स जबरदस्त झाल्याची पोचपावती दिली आणि विद्यार्थायंना खुप साख्या शुभेच्छा दिल्या.

 

Tags: