केआरकेचा सनीला बहुमोल सल्ला

सचिन तेंडुलकरपेक्षा सलमान खान महान असल्याची मुक्ताफळं उधळल्यावर कमाल राशिद खान म्हणजे केआरकेने आता आपला मोर्चा सनी लिऑनकडे वळवला आहे. ट्विटरवर सनीने आपल्या अ‍ॅडल्ट फिल्म्सची माहिती देऊ नये, असा मौलिक सल्ला केआरकेने सनी लिऑनला दिला आहे.

Updated: Apr 7, 2012, 01:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सचिन तेंडुलकरपेक्षा सलमान खान महान असल्याची मुक्ताफळं उधळल्यावर कमाल राशिद खान म्हणजे केआरकेने आता आपला मोर्चा सनी लिऑनकडे वळवला आहे. ट्विटरवर सनीने आपल्या अ‍ॅडल्ट फिल्म्सची माहिती देऊ नये, असा मौलिक सल्ला केआरकेने सनी लिऑनला दिला आहे.

 

सनी लिऑनच्या पॉर्न फिल्म तरूण मनांवर वाईट परिणाम करू शकतात असं केआरकेला वाटतंय. केआरकेने ट्विट केलंय, “निदान वेबवर आपल्या पॉर्न फिल्म्स विकणं तर बंद कर. लहान मुलांवर त्याचे वाईट परिणाम होतायत.”

 

मुख्य म्हणजे याच केआरकेने पॉर्न फिल्म्स अधिकाधिक क्रिएटिव्ह कशा बनवता येतील, याबद्दल सल्ले दिले आहे. यापूर्वी केआरकेने असंही म्हटलं होतं की सनीच्या जिस्म-२ मध्ये मला अजिबात रस नाही, कारण, मी तिचं ‘जिस्म’ पॉर्न सिनेमांतून अनेक वेळा पाहिलंय. आणि आता तोच सनी लिऑनला सल्ले द्यायला लागलाय. सनीने त्याचा सल्ला मानला, तर चांगलंच होईल..बघू ऐकतेय का !

 

Tags: