1913- 1950
3 मे 1913 चा दिवस उजाडला तोच मुळी भारतीय चित्रपटसृष्टीचं उज्वल भवितव्य घेऊन...'राजा हरीश्चंद्र' हा सिनेमा मुंबईतल्या कॉरोनेशन थिएटरमध्ये झळकला आणि इथूनच भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंनी हा पहिला मूकपट तयार केला... हलत्या चित्रांचा उदय झाला... पहिला सिनेमा तयार करताना दादासाहेब फाळकेंना आर्थिक संकटांनाही तोंड द्यावं लागलं.. मात्र, हलत्या चित्रांच्या ध्यासानं पछाडलेल्या या तरुणानं या आर्थिक संकटांवरही मात केली..
त्यानंतर अनेक मूकपट त्या काळात निर्माण झाले.. मात्र, 1931 साली आर्देशिर इराणी यांनी 'आलम आरा' हा पहिलावहिला बोलपट निर्माण केला आणि भारतीय सिनेमा समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करु लागला.. याच काळात 1934 साली बॉम्बे टॉकिजची स्थापना झाली आणि हिंदी सिनेमा ख-या अर्थाने बहरु लागला...पौराणिक आणि ऐतिहासिक सिनेमावरुन हळुहळू हिंदी सिनेमा रोमॅण्टिक होऊ लागला.. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे ‘देवदास’. हिंदी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेला ‘देवदास’ हा सिनेमा 1936 साली पहिल्यांदा झळकला. पी.सी. बोरा दिग्दर्शित या सिनेमात के. एल. सेहेगल, जमुना बोरा आणि टी. आर. राजकुमारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि याच सिनेमाची प्रेरणा घेऊन हिंदी सिनेसृष्टीत देवदासचे रिमेक करण्यात आले. के. एल. सेहेगल, देविका राणी, सितारा देवी, अशोक कुमार या कलाकारांनी हा काळ गाजवला..
त्यानंतर ‘ज्वारभाटा’ या सिनेमातून दिलीप कुमार या तरुणाचं हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण झालं... जुगनू, मेला, अंदाज या सिनेमातून दिलीप कुमार यांनी आपल्यातल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली..
त्याच सुमाराला, 1949 साली ‘महल’ सिनेमातून भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण झालं.. मधुबालासाठी लता दीदींनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं.. एकीकडे, दिलीप कुमार, मधुबाला, नर्गिस या ता-यांचा उदय होत असतानाच राजकपूर या तरुणाने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं... आणि सारी गणितचं बदलून टाकली.. ‘बरसात’ या सिनेमाचं दिग्दर्शन करुन अभिनयाबरोबरच आपल्यातल्या दिग्दर्शकाचीही दखल घ्यायला हिंदी सिनेसृष्टीला भाग पाडलं.. आणि इथूनच हिंदी सिनेमा बदलत गेला....