बॉलिवूड स्टारना अजमेर दर्ग्यात नो एंट्री

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार तसेच बॉलिवूड स्टार आणि आपल्या मनातील ईच्छापूर्तीसाठी अनेक भाविक जयपूरमधील अजमेर दर्ग्याला भेट देत असतात. मात्र, यापुढे बॉलिवूड स्टारमंडळीना अजमेर दर्ग्याची दारे बंद करण्यात आली आहे.

Updated: Jul 23, 2012, 01:35 PM IST

www.24taas.com, अजमेर 

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार तसेच बॉलिवूड स्टार आणि आपल्या मनातील ईच्छापूर्तीसाठी अनेक भाविक जयपूरमधील अजमेर दर्ग्याला भेट देत असतात. मात्र, यापुढे बॉलिवूड स्टारमंडळीना अजमेर दर्ग्याची दारे बंद करण्यात आली आहे.

ख्वाजा मुइनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यात चित्रपट कलाकारांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.  इस्लाममध्ये नृत्य आणि चित्रपटाला परवानगी नसल्याचे आणि सध्याचे चित्रपट हे अश्लिलतेला प्रोत्साहन देणारे असल्याचे दर्ग्याचे दिवाण जैनुल अबेदीन अली खान यांनी म्हटले आहे. त्यामुळे कलाकारांना प्रवेश नाकारण्याबाबत इस्लाममधील धर्मज्ञांना या विषयी विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, इस्लामीक धर्मज्ञांनी अद्याप याविषयी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. इस्लाममध्ये ज्या गोष्टींना प्रतिबंध आहे त्यासाठी  दर्ग्यासारख्या पवित्र ठिकाणाचा उपयोग होऊ नये, असे दर्गाप्रमुखांनी म्हटले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.