रागिनी MMS पार्ट-२ मध्ये सनी लिऑन

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑन आत हळूहळू बॉलिवुडमध्ये आपले बस्तान बसवत आहे. पूजा भट्ट हिच्या जिस्म-२ द्वारे बॉलिवुडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनीने या काळात दुसरा चित्रपट पटकावण्यात यश मिळविले आहे. पूजा भट्ट हिच्यानंतर सनी लिऑनने आता बालाजी टेलिफिल्मसची मालकीण एकता कपूरलाही प्रभावित केले आहे.

Updated: Apr 22, 2012, 09:02 AM IST

www.24taas.com, मुंबई

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑन आत हळूहळू बॉलिवुडमध्ये आपले बस्तान बसवत आहे. पूजा भट्ट हिच्या जिस्म-२ द्वारे बॉलिवुडमध्ये एन्ट्री करणाऱ्या सनीने या काळात दुसरा चित्रपट पटकावण्यात यश मिळविले आहे. पूजा भट्ट हिच्यानंतर सनी लिऑनने आता बालाजी टेलिफिल्मसची मालकीण एकता कपूरलाही प्रभावित केले आहे.

सनी लिऑनला एकता कपूरने रागिनी एमएमएस या हॉरर चित्रपटाच्या सिक्वलसाठी ऑफर दिली आहे. सनी या चित्रपटाच्या मेन रोलमध्ये दिसणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्सचे सीईओ तरूण गर्ग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तरूण यांनी ट्विटरवर याचा खुलासा केला आहे. आम्ही सेल्सी सनी लिऑनला रागिनी एमएमएस पार्ट-२ साठी साइन केले आहे.

हा चित्रपट वास्तविक काहणीवर बेतलेला असून या चित्रपटाला अधिक व्यापक बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यात सेक्स आणि कामुकतेचा भडीमार असणार आहे.