विद्याचा भाव होणार 'बुम्बाट'

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या मानधनाचा आकडा त्यांच्या लोकप्रियतेनुसार वाढत जातो आहे. डर्टी पिक्चरनंतर सगळीकडेच बोलबाला असेलेल्या विद्या बालनच्या मानधनाचा आकडाही लवकरच दुप्पट होणार आहे. बॉलिवूड स्टार्सचं मानधन हा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Updated: Jan 3, 2012, 08:30 PM IST

www.24taas.com

 

बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या मानधनाचा आकडा त्यांच्या लोकप्रियतेनुसार वाढत जातो आहे. डर्टी पिक्चरनंतर सगळीकडेच बोलबाला असेलेल्या विद्या बालनच्या मानधनाचा आकडाही लवकरच दुप्पट होणार आहे. बॉलिवूड स्टार्सचं मानधन हा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच या स्टार्सच्या फॅन्सनाही हे तारे किती मानधन घेतात याविषयी उत्सुकता असते. त्यांच्या प्रसिद्धीच्या आलेखानुसारच मानधनाचे त्यांचे आकडे बदलत जातात.

 

असंच काहीसं घडलं आहे बॉलिवूडच्या टॉप थ्री ऍक्ट्रेसेसच्या बाबतीत. करीना कपूर, कतरीना कैफ आणि विद्या बालन यांच्या बाबतीत. सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या विद्या बालनला सध्या २ कोटी इतकं मानधन मिळतं. डर्टी नंतर विद्याचं मानधन वाढून वाढून  २ कोटींपर्यंत पोहोचलं आहे. तिच्या पेक्षा करीना आणि कतरिना या सध्याच्या टॉप दोनच्या हिरॉईन्सचं मानधन मात्र  बऱ्य़ापैकी जास्त आहे.

 

करीनानं हिरॉईनसाठी ७ कोटी तर कतरिनानं धूम ३ साठी  ४ कोटींची मागणी करुन खान मंडळींची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता विद्या बालनंही २०१२ मध्ये आपल्या मानधनाचा आकडा दुपटीनं वाढवण्याची तयारी करते आहे. अर्थात विद्याही करिना आणि कतरिनाच्या पंक्तीत लवकरच जाऊन बसणार आहे असंच चित्र दिसतं आहे.  आणि बरोबरच आहे म्हणा करीना आणि कतरिनाच्या ग्लॅमर पेक्षा विद्यातल्या अभिनयातल्या वैविध्यामुळे तिची गणना शाहरुख-आमीरशी होऊ लागली आहे. सो कीप इट अप विद्या....