सनी लिऑन गावठी कुत्र्यांच्या प्रेमात

सनीनेच आपल्या छंदांची माहिती दिली आहे. तिला कुत्रे फार आवडतात. नुकतीच पेटासाठी सनीने जाहिरात केली. यामध्ये सनीने ब्लॅक टी-शर्ट घातला आहे, या टी-शर्टवर कुत्र्यांवर प्रेम करा, असा संदेश लिहीलेला आहे. या टी-शर्टवर ‘आय लव्ह देसी डॉग्ज’ असं लिहीलंय

Updated: May 2, 2012, 06:47 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

भारतात आल्यापासून काही ना काही कारणाने सनी लिऑन चर्चेत राहतेय. कधी आपल्या सिनेमातील हॉट फोटो शूटमधून तर कधी आपल्या खऱ्या नावावरून. सनीला कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे. आता तिने लोकांना सल्ला दिला आहे की लोकांनी गावठी कुत्र्यांवर प्रेम करावं आणि त्यांच्याशी प्रेमाने वागावं.

 

सनी लिऑनला काय आवडतं, याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. त्यामुळे खुद्द सनीनेच आपल्या छंदांची माहिती दिली आहे. तिला कुत्रे फार आवडतात. नुकतीच पेटासाठी सनीने जाहिरात केली. यामध्ये सनीने ब्लॅक टी-शर्ट घातला आहे, या टी-शर्टवर कुत्र्यांवर प्रेम करा, असा संदेश लिहीलेला आहे. या टी-शर्टवर ‘आय लव्ह देसी डॉग्ज’ असं लिहीलंय.

 

आत्तापर्यंत सनी वेगवेगळे सिनेमे साईन करण्याबद्दल चर्चेत होती. आता तिने आपलं कुत्र्यांबद्दलचं प्रेम जगजाहीर करत जगाला गावठी कुत्र्यांबद्दल प्रेमाचा संदेश दिला आहे.