ढोलकीच्या तालावर, फक्कड लावण्यांचा ठेका,

ढोलकीच्या तालावर या रिएलिटी शो आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतो आहे. या आठड्यातही लावण्यवतींनी बहारदार लावण्या सादर केल्या आहेत.

Updated: Feb 28, 2012, 01:18 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ढोलकीच्या तालावर या रिएलिटी शो आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतो आहे. या आठड्यातही लावण्यवतींनी बहारदार लावण्या सादर केल्या आहेत. ढोलकीच्या तालावर या रिएलिटी शोचा बुधवारचा भाग विशेष असणार आहे. कारण, बुधवारच्या भागात हजेरी लावली आहे ती ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी.

 

आणि म्हणूनच या अप्सरांनी सुलोचना चव्हाण यांच्या बहारदार लावण्या सादर केल्या. तर सोनाली खरेने सादर केली सुलोचना चव्हाण यांचीच भन्नाट लावणी.  तर वैशाली जाधव आणि  स्नेहा वाघ यादेखील ठसकेबाज लावण्यांवर बेभान होऊन थिरकल्या.

 

इतकंच नाही तर, पियुषा आणि सोनाली पवारनेही फक्कड लावणी सादर केली.  एकूणंच काय सुलोचना चव्हाण यांची उपस्थिती आणि लावण्यवतींनी सादर केलेल्या ठसकेबाज लावण्यांमुळे हा एपिसोड रंगतदार असणार हे नक्की..