पवित्र रिश्ताचा प्रवास २० वर्ष पुढे...

पवित्र रिश्ता ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मानव आणि अर्चनामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. तर दुसरीकडे, ही मालिका आता 20 वर्ष लीप घेणार आहे. सोहमच्या दुराव्याने मानव पुरता कोसळून गेला.

Updated: Dec 8, 2011, 06:19 PM IST

झी २४ तास वेब टीम

 

पवित्र रिश्ता ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मानव आणि अर्चनामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला. तर दुसरीकडे, ही मालिका आता 20 वर्ष लीप घेणार आहे. सोहमच्या दुराव्याने मानव पुरता कोसळून गेला. आणि या सगळ्याला मानवने अर्चनाला जबाबदार ठरवलं आहे. इतकचं नाही तर, आपल्या मुलींपासूनही कायमच दूर जाण्यास मानवने अर्चनाला सांगितलं.

 

मानवच्या सुखासाठी, त्याच्या प्रेमासाठी अर्चनासुद्धा मानवच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे. आणि इथेच मालिकेत येणार आहे एक ट्विस्ट. मानव आणि अर्चनाची पुढची पिढी लवकरच मालिकेत पहायला मिळणार आहे.. आता मालिका लीप घेणार म्हटल्यावर अर्चना-मानवचा लूकही बदलणार.

 

चला, एकूण काय तर आता एकमेकांपासून दूर गेलेल्या अर्चना-मानवला त्यांची पुढची पिढी एकत्र आणणार का? मालिकेत आता काय नवीन ड्रामा पहायला मिळणार याचीच प्रतिक्षा करुया.