अण्णा हजारे संचेती रुग्णालयात दाखल

अण्णा हजारेंना पुण्याच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णांची प्रकृती खालवल्याने त्यांना राळेगण सिद्धीहून पुण्याला हलवण्यात आलं. अण्णांच्या छातीत संसर्ग झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे.

Updated: Dec 31, 2011, 11:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

अण्णा हजारेंना पुण्याच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णांची प्रकृती खालवल्याने त्यांना राळेगण सिद्धीहून पुण्याला हलवण्यात आलं. अण्णांच्या छातीत संसर्ग झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं ॉआहे.

 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना छातीत संसर्गाची लागण झाल्याने त्यांना उद्या तपासणीसाठी पुण्याच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. मुंबईत एमएमआरडीए इथे अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तेंव्हाच त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळेच अण्णांनी उपोषण एक दिवस आधीच सोडलं होतं.

 

अण्णांनी प्रकृती अस्वास्थ्यमुळे राळेगण सिद्धीला जाणं पसंत केलं होतं. आज टीम अण्णांची महत्वपूर्ण बैठक अण्णांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करावी लागली. आज रात्री त्यांना राळेगण सिद्धीहून पुण्याला हलवण्यात येणार आहे.

[jwplayer mediaid="21898"]

Tags: