एनडीएनं दिली ‘भारत बंद’ची हाक

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएनं ३१ मे रोजी भारत बंद पुकारलाय. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात ३१ मेला म्हणजे पुढच्या गुरुवारी देशभर आंदोलन करण्यात येणार आहे.

Updated: May 24, 2012, 11:55 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

 

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएनं ३१ मे रोजी भारत बंद पुकारलाय. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात ३१ मेला म्हणजे पुढच्या गुरुवारी देशभर आंदोलन करण्यात येणार आहे.

 

याबाबत एनडीएच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा केल्याचं एनडीएचे समन्वयक शरद यादव यांनी सांगितलं. पेट्रोल दरवाढ ही पेट्रोलियम कंपन्यांनी केली या सरकारचा बचाव म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याची टीका यावेळी यादव यांनी केलीय.

 

महागाईच्या भडक्यात नवा पेट्रोल बॉम्ब पडलाय. पेट्रोलचे दर प्रतिलिटर साडे सात रुपयांनी महाग झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची झालेली घसरण, तेलाचे वाढते भाव या साऱ्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. एवढ्या मोठ्या पेट्रोल दरवाढीमुळे महागाईत आणखी वाढ होणार, हे वेगळं सांगायला नकोच. युपीएच्या तिसऱ्या वर्षपूर्तीनंतर आणि संसदेचं बजेट सेशन संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हा निर्णय तेल कंपन्यांनी घेतलाय. पेट्रोलचा धक्का कमी की काय म्हणून त्यापाठोपाठ आता डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिगटाची याबाबत महत्त्वपूर्ण बैठक होत असून, या बैठकीत सबसिडी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या पेट्रोल दरवाढीमुळे सामान्यांचं जगणंच कठीण होणार आहे.