कनवाळू सरकार उदार, मोफत मोबाईल वाटणार

केंद्र सरकारनं आता आणखी एक अनोखी योजना आखलीय. या योजनेनुसार केंद्र सरकारकडून दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत मोबाईल दिला जाणार आहे. यासाठी ‘दयाळू’ सरकारनं तब्बल ७ हजार करोड रुपयांची तरतूददेखील केलीय. पण, ज्यांच्यासाठी ही योजना सरकार लागू करणार आहे ती कुटुंब पैसे ‘रिचार्ज’वर खर्च करणार की जीवनावश्यक गोष्टींवर हा प्रश्न लोकांना पडलाय.

Updated: Aug 8, 2012, 10:54 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

केंद्र सरकारनं आता आणखी एक अनोखी योजना आखलीय. या योजनेनुसार केंद्र सरकारकडून दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत मोबाईल दिला जाणार आहे. यासाठी ‘दयाळू’ सरकारनं तब्बल ७ हजार करोड रुपयांची तरतूददेखील केलीय. पण, ज्यांच्यासाठी ही योजना सरकार लागू करणार आहे ती कुटुंब पैसे ‘रिचार्ज’वर खर्च करणार की जीवनावश्यक गोष्टींवर हा प्रश्न लोकांना पडलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग हे या योजनेची घोषणा करणार आहेत. देशातल्या प्रत्येक व्यक्तिच्या हातात एक मोबाईल आवश्यक आहे, असं कनवाळू सरकारला वाटतंय.

सर्व बीपीएल कार्ड धारकांना या योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. जवळपास ६० लाख बीपीएल कुटुंब याचा फायदा उठवण्याची शक्यता आहे. या योजनेनुसार, मोबाईल दिल्यानंतर त्यावर २०० मिनिटांचा मोफत टॉकटाईमही दिला जाईल.

.

Tags: