कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येणार

येत्या पाच वर्षात देशातील संपूर्ण लोकसंख्येची कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघात या आजारांचे लवकर निदान आणि उपचार करता यावेत यासाठी आरोग्य तपासणी करण्याची सरकारची योजना असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं.

Updated: Dec 13, 2011, 12:56 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली.

येत्या पाच वर्षात देशातील संपूर्ण लोकसंख्येची कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघात या आजारांचे लवकर निदान आणि उपचार करता यावेत यासाठी आरोग्य तपासणी करण्याची सरकारची योजना असल्याचं गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. आझाद यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या दरम्यान आरोग्य तपासणीसाठी २१ राज्यातील १०० जिल्ह्यांमध्ये कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघाताच्या प्रतिबंधासाठी आणि निदानासाठी पायलट प्रोजेक्ट लँच केल्याचं सांगितलं.

 

संपूर्ण लोकसंख्येची अशा प्रकारची तपासणी करणारा भारत जगातील पहिला देश असेल असं आझाद म्हणाले. सरकारने निदान आणि उपाचारासाठीच्या पायलट प्रोजेक्टसाठी उपकरण आणि मनुष्यबळ पुरवलं आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार देशात जवळपास २७ लाख लोकं कॅन्सरने बाधित आहेत. देशात दरवर्षी अकरा लाख लोकांना कॅन्सर
होतो तसंच कॅन्सरमुळे पाच लाख लोकं मृत्युमुखी पडतात असंही आझादांनी सांगितलं.

 

कॅन्सरवरील मोफत उपचारांसाठी दारिद्रय रेषे खालील लोकांसाठी राष्ट्रीय आरोग्य निधी अंतर्गत दीड लाख रुपयांचे सहाय्य करण्यात येतं. आरोग्य मंत्रालय दीड लाखांपेक्षा जास्त सहाय्य मागणाऱ्या केसेसना आर्थिक सहाय्य देतं. पण सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दारिद्रय रेषेखालील लोकांनाच हे सहाय्य देण्यता येतं. यंदाच्या वर्षात २००० रुग्णांना सरकारने आर्थिक सहाय्य दिलं.