कळकट रेल्वेस्थानक नव्हे तर चकचकीत विमानतळ

Updated: Nov 17, 2011, 05:10 PM IST
झी २४ तास वेब टीम, मुंबई
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या धर्तीवर रेल्वे स्टेशन्स अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना करण्याचा संकल्पनेवर सरकार काम करत असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदींनी भोपळ इथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं. रेल्वे स्टेशन्स अथॉरिटी ऑफ इंडियाची रचना कशी असणार आहे ते जाहीर केल्याचंही त्यांनी सांगितलं. रेल्वे स्टेशन्स ऑथरिटी ऑफ इंडिया स...र्व सुविधांनी युक्त अशी रेल्वे स्थानके विकसीत करण्यावर भर देणार असल्याचं ते म्हणाले.
आधुनिक विमानतळां सारख्याच सर्व सूविधा रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असल्या तरच ती जागतिक दर्जाची ठरु शकतील. रेल्वे स्थानकांवर वाचनालयं, दुकाने, स्वच्छ आणि चांगली राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स असली पाहिजेत. रेल्वे या सूविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीच्या मॉडेलचा विचार करत आहे. रेल्वेकडे भरपूर जमीन आहे आणि भांडवल गुंतवण्याची क्षमता असणाऱ्या मोठ्या कंपन्यांशी भागीदारी करण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी इतर स्त्रोत विकसीत करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात रेल्वे मंत्र्यांनी जपानचे उदाहरण दिलं. जपानमध्ये रेल्वे ४० टक्के उत्पन्न सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी मॉडेलच्या माध्यमातून मिळवते. बोरिवली, सीएसटी, चेन्नई, नवी दिल्ली आणि हावडा ही रेल्वेस्थानके सोन्याची खाण ठरतील असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. केवळ भाडेवाढ करुन रेल्वेच्या उत्पन्नात फक्त दोन ते तीन हजार कोटींची वाढ होईल पण तीन लाख कोटी रुपयांची गरज आहे.