केरळात एचआयव्ही-एडस बाधितांना पेन्शन

जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. केरळ राज्य सरकारने एआयव्ही-एडसने बाधितांसाठी दर महिना ५२० रुपयांचे पेन्शन जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचं पत्रकारांना सांगितलं.

Updated: Dec 1, 2011, 04:15 AM IST

झी २४ तास वेब टीम, थिरुअनंतपुरम

जगभरात १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. केरळ राज्य सरकारने एआयव्ही-एडसने बाधितांसाठी दर महिना ५२० रुपयांचे पेन्शन जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अशा प्रकारची ही पहिलीच योजना असल्याचं पत्रकारांना सांगितलं. एचआयव्ही-एडस रुग्णांना दर महिन्याला ४०० रुपये देण्यात येतील आणि त्यांच्या मृत्यूनंतर ही रक्कम त्यांच्या वारसदारांना देण्यात येईल असंही चंडी म्हणाले.

 

एडस किंवा एचआयव्ही बाधित रुग्णांना वारंवार रुग्णालयात उपचारांसाठी जावं लागत असल्याने त्यांना मासिक प्रवास खर्चासाठी १२० रुपये अधिक देण्यात येतील असं चंडी यांनी सांगितलं. केरळ स्टेट एडस कंट्रोल सोसायटीने दिलेल्या आकडेवारीनुसार केरळ राज्यात ५५,१६७ लोकांना एचआयव्ही-एडसची लागण झाली आहे. केरळमध्ये पल्लकड जिल्ह्यात सर्वाधिक लोकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे.