गोव्यात कुणाचंच काही खरं नाही....

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांची घोषणा होण्यास उशीर झाला आहे. गोव्यासह उत्तर प्रदेशचीही विधानसभा निवडणूक होते आहे. उत्तर प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्वाचं राज्य असल्यानं सर्वच पक्षांनी तिथं लक्ष केंद्रीत केल आहे.

Updated: Jan 26, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com, गोवा

 

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांची घोषणा होण्यास उशीर झाला आहे. गोव्यासह उत्तर प्रदेशचीही विधानसभा निवडणूक होते आहे. उत्तर प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्वाचं राज्य असल्यानं सर्वच पक्षांनी तिथं लक्ष केंद्रीत केल आहे. त्यामुळं गोव्यातील आघाडी आणि युतीचा निर्णय़ लांबणीवर पडला आहे. शिवाय उमेदवार निश्चितीही झालेली नाही. त्यामुळं स्थानिक पातळीवर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

 

गोवा हे छोटं राज्य असलं तरी राजकीयदृष्ट्या कायम अस्थिर म्हणून गोव्याची ओळख आहे. उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर होत असल्यानं निवडणुकीची आयत्या वेळी तयारी कशी करायची असा सवाल इच्छुक नेते करत आहेत.

 

आघाडी आणि युती याचं गोव्यात काय होणार हे तसचं आधांतरी आहे मात्र गोव्यात गेली अनेक वर्ष सत्तातंर झालेली पाहायला मिळतात, त्यामुळे गोव्यात अनेक इच्छुकांच्या डोक्यावर टांगती तलवारच आहे.