Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?

Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच महागात पडलं. त्यामुळं अजित पवारांनी आता खबरदारी घेतली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2024, 08:40 PM IST
Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज? title=

Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच महागात पडलं. त्यामुळं अजित पवारांनी आता खबरदारी घेतलीय. मोदींच्या सभेसाठी शिवसेना भाजपचे उमेदवार आग्रही असताना अजित पवार मात्र बारामतीत मोदींची सभा नको असं सांगू लागलेत. अजित पवारांच्या या पवित्र्यामुळं नाही म्हटलं तरी भाजप नेते थोडे नाराज झालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा मिळावी यासाठी महायुतीच्या उमेदवार प्रयत्नशील आहेत. असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची बारामतीत सभा नको अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींनी बारामतीत सभा घेतली होती. या सभेत मोदींकडून भटकती आत्मा असा शब्दप्रयोग मोदींसाठी करण्यात आला होता. 

भटकती आत्मा या शब्दप्रयोगामुळं बारामतीच्या निवडणुकीचं गणित बिघडल्याचा समज अजित पवारांचा झाला आहे. विधानसभा निवडणुकीत अशीच वक्तव्यं झाल्यास पुन्हा दगाफटका होण्याची भीती अजित पवारांना आहे. त्यामुळं अजित पवारांनी बारामतीत बाहेरच्या कुणाच्या सभा नको असा पवित्रा घेतला आहे.

अजित पवारांचा राष्ट्रवादी हा वेगळा पक्ष आहे, त्यांची वेगळी भूमिका असू शकते असं सांगत भाजपाने हे प्रकरण फार वाढू न देण्याची खबरदारी घेतली आहे. 

पंतप्रधान मोदींची प्रचारसभा म्हणजे हमखास विजय अशी भावना भाजपच्या उमेदवारांमध्ये आहे. इथं मात्र महायुतीच्या सर्वोच्च नेत्याची सभा बारामतीत नको अशी भूमिका अजितदादांनी घेतली आहे. अजितदादांची ही रणनीती यशस्वी होते का हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.