टू जी घोटाळ्यातील ए राजाला जामीन

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी केलेल्या अर्ज सुनावणी करताना सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीन मंजूर केला आहे.

Updated: May 15, 2012, 12:54 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी केलेल्या अर्ज  सुनावणी करताना सीबीआयच्या विशेष कोर्टात जामीन मंजूर केला आहे.

 

गेल्या १५ महिन्यांपासून तिहार कारागृहात ए राजा होता.  देशातल्या सर्वात गाजलेल्या घोटाळ्यातील इतर आरोपी संजय चंद्रा, स्वॉन टेलिकॉम प्रमोटर विनोद गोएंका, रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे गौतम दोषी, सुरेंद्र पिपारा, हरि नायर, डीएमकेच्या खासदार कनिमोळी, कलाइनार टीव्हीचे तत्कालीन एमडी शरद कुमार, फिल्म निर्माता करीम मोरानी, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, शाहिद उस्मान बलवा यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.