नव्या युगातली 'मनुस्मृती'

हैदराबादच्या सरदार पटेल नॅशनल पोलीस अकादमीच्या आयपीएस पासिंग परेडमध्ये संचालन करणाऱ्या मनुस्मृती पोलीस इतिहासात अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली. महिला पोलीस अधिकारी मनुस्मृतीने आपल्या कुटुंबाची १९२१ सालापासूनची पोलीस सेवेची अखंडित परंपरा कायम राखली.

Updated: Nov 6, 2011, 12:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
हैदराबादच्या सरदार पटेल नॅशनल पोलीस अकादमीच्या आयपीएस पासिंग परेडमध्ये संचालन करणाऱ्या मनुस्मृती पोलीस इतिहासात अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली. महिला पोलीस अधिकारी मनुस्मृतीने आपल्या कुटुंबाची १९२१ सालापासूनची पोलीस सेवेची अखंडित परंपरा कायम राखली. मनुस्मृतीच्या रुपाने तिच्या कुटुंबातील चौथी पिढी भारतीय पोलीस सेवेत दाखल झाली आणि हा जागतिक विक्रम मानण्यात येतो. मनुस्मृतीच्या कुटुंबाने ९० वर्षे भारतीय पोलिस दलाची सेवा केली आहे. मनुस्मृतीने दिल्लीच्या सेंट स्टीफन्स आणि लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.

 

मनुस्मृतीचे वडील कमलेंद्र प्रसाद हे १९८१ बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते उत्तर प्रदेश कॅडरमध्ये कार्यरत आहेत. सध्या ते दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ क्रिमिनोलॉजी अँड फोरेनसिक सायन्सचे संचालक आहेत. एकाच वेळी आयपीएसमध्ये वडिल आणि मुलगी कार्यरत असण्याचा आणखी एका अनोख्या विक्रमाची नोंद मनुस्मृती आणि तिच्या वडिलांनी केली. मनुस्मृतीचे आजोबा अरबिंद प्रसाद हे बिहार पोलिस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजु झाले आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून १९८८ साली निवृत्त झाले. मनुस्मृतीचे पणजोबा हरिहर प्रसाद वर्मा हे ब्रिटीश राजवटीत १९२१ साली कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले आणि असिस्टिंट इन्स्पेक्टर म्हणून १९५४ साली निवृत्त झाले.
मनुस्मृती ही इनलॅक स्कॉलर असून तिने कोलकात्याच्या सीएसएसएसमधून एम फिल पूर्ण केलं आहे तर सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकादमीत कायद्याच्या परिक्षेत ती सर्वप्रथम आली.