www.24taas.com, नवी दिल्ली
उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होणार असून युपीएकडून हमीद अन्सारी आणि एनडीएकडून जसवंत सिंग उमेदवार आहेत. या निवडणूकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात.
सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतांचं बलाबल पाहता हमीद अन्सारी यांचं पारडं जड असून त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. हमीद अन्सारी जिंकल्यास ते दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती बनतील. लोकसभेचे ५४५ आणि राज्यसभेचे २४५ मिळून ७९० सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराला ३९५ मतं मिळणं गरजेचं आहे. युपीएकडे ३२९ मतं आहेत. तर सपा, बसपा आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा गृहित धरता हमीद अन्सारींना चारशेच्या आसपास मतं मिळतील असा अंदाज आहे.