झी २४ तास वेब टीम, मुंबई
भारत आणि पाकिस्तान दरम्यान हेलिकॉप्टरवरुन निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. भारतीय सेना दलाच्या १४ व्या कोअरचे एक चिता हेलिकॉप्टर पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दती शिरले होते. पाकिस्तान सैन्याने या हेलिकॉप्टरला खाली उतरण्यास भाग पाडलं होतं. पाक सैन्याने हेलिकॉप्टर आणि चार सैनिकांना ताब्यात घेतलं होतं. पाकिस्तानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा दावा पाक सैन्याने केला होता. हा तिढा सुटण्साठी दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय बोलणी सुरु होती. अखेर पाकिस्तानने हेलिकॉप्टरला परतण्यास परवानगी दिली आहे. मेजर कपिला आणि राजा या हेलिकॉप्टरमध्ये होते. परराष्ट्रमंत्र कृष्णा यांनी पाकिस्तानचे आभार मानले आहेत.