मणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता

मणिपूरमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच आघाडी घेत वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तिपाईमुखची जागा जिंकून आपली खाते उघडले आहे, तर १४ ठिकाणी आघाडी मिळविली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसने सत्ताकडे निर्विवाद एकहाती वाटचाल केली आहे. याठिकाणी विरोधकांचे पानीपत झाले आहे.

Updated: Mar 6, 2012, 11:47 AM IST

www.24taas.com, इंफाळ

मणिपूरमध्ये  काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच आघाडी घेत वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तिपाईमुखची जागा जिंकून आपली खाते उघडले आहे, तर १४ ठिकाणी आघाडी मिळविली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसने सत्ताकडे निर्विवाद एकहाती वाटचाल केली आहे. याठिकाणी विरोधकांचे पानीपत झाले आहे.

काँग्रेसव्यतिरिक्त नागा पिपल्स फ्रंट (एनपीएफ)ने कराँग येथील जागा जिंकल्याचे स्पष्ट होत आहे. तपाईमुख येथून काँग्रेसचे उमेदवार कॅलटॉनलियन अमो यांनी तृणमुल काँग्रसचे उमेदवार एल. फिमेट यांचा ९१२ मतांनी पराभव केला. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री ओकराम लबोबी सिंह हे थौबल येथून आणि त्यांत्या पत्नी ओ. लांढोनी या खांगाबोक येथून आघाडीवर आहेत.

६० जागांसाठी होत असलेल्या मतमोजणीत काँग्रेसचेच वर्चस्व राहणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ३० जागा जिंकण्यात यश मिळविले होते. त्यामुळे याठिकाणी या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा आपला वरचष्मा दाखवून दिला आहे.