झी २४ तास वेब टीम, मुंबई
शरद पवारांवर झालेला हल्ला हा भ्याडच आहे. अश्या तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे राज ठाकरे यांनी. शरद पवारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाच पण हा हल्ला मराठी माणूस कदापि सहन करणार नाही, त्याचप्रमाणे हा हल्ला करणार युवक पवार साहेंबापर्यंत पोचलाच कसा, यामागे काही षडयंत्र आहे का अशी शंकाच राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच जसा पवारांवर हल्ला झाला तेव्हा लगेचच सुप्रिया सुळे यांना फोन करून शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
राज ठाकरे यांनी म्हटले जर भष्ट्राचार याबद्दल इतका राग येत असेल तर त्या सरदार व्यक्तीने मनमोहन यांच्या कानाखाली मारायला हवी होती, पंजाबमध्येही भष्ट्राचार खूप मोठ्या प्रमाणात आहेच की, आणि राज ठाकरे यांनी दिल्लीतील हिंदी चॅनेलवाले आता काय करतात याकडेच पाहणार असल्याचे सांगितले, कारण की मराठी माणसाला दिल्लीत कशी वागणूक दिली जाते हे देखील माहिती आहे. महाराष्ट्रात आमचे राजकीय मतभेद आहेत, पण ते आमचं आम्ही पाहून घेऊ, असा हल्ला कधीही निंदनीयच आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. मनमोहन सिंगांपासून हल्ल्याची का सुरुवात केली नाही अशी कडवट प्रतिक्रिया राज यांनी दिलीय. पवारांना भेटण्यासाठी शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकर नवी दिल्लीला रवाना झालेत.