मोदी घाबरू नका, संघाची साथ तुम्हालाच

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. नितीन कुमार यांचे वक्तव्य वैयक्तीक स्वार्थापोटी केल्याची टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

Updated: Jun 20, 2012, 11:55 AM IST

www.24taas.com, नागपूर

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. नितीन कुमार यांचे वक्तव्य वैयक्तीक स्वार्थापोटी केल्याची टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

 

हिंदूत्ववादी पंतप्रधान का नको असा सवाल करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच समर्थनात संघानं या वादात उडी घेतली आहे. तसंच धर्मनिरपेक्षतेच्या चर्चेला नितीश कुमार यांनीच तोंड फोडलं आहे.

 

त्यामुळं आतापर्यंतचे पंतप्रधान धर्मनिरपेक्ष नव्हते का असा सवालही संघानं केला आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार धर्मनिरपेक्षच हवा असं वक्तव्य नितीन कुमार यांनी केलं होतं. यामुळं मोदींच्या दावेदारीलाच सुरूंग लावण्याचा प्रयत्न कुमारांनी केला होता.