www.24taas.com, नवी दिल्ली
महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यामुळे महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन करु नये अशी मागणी त्यांनी केली होती. दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन वादाच्या भोव-यात सापडलंय. सदनाचं उद्घाटन करण्यास राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नकार दिलाय.
महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. त्यामुळं महाराष्ट्र सदनाचं उद्घाटन करु नये अशी मागणी त्यांनी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बेनामी कंपन्या स्थापन करुन कोट्यवधींची कंत्राटे घेतल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.
भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या नावे एल अन्ड टी आणि अशोका बिल्ड्कॉन यांच्याकडून आलेल्या रकमेची ही कागदपत्रं किरीट सोमय्या यांनी उघड केली. के एस चमणकर यांना महाराष्ट्र सदनाचं बांधकाम ५२ कोटीला देण्यात आलं मात्र ते आता तब्बल १५२ कोटींवर गेलंय, असा आरोप किरिट सोमय्यांनी केला. दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कोट्यावधी रूपयांची कंत्राटे कशी दिली गेली, असा सवाल उपस्थित करत या सदनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करू नये, असं आवाहनही केलं होतं.राज्यात पहिल्या क्रमांकाचे नेते होण्याची भुजबळांची चढाओढ लवकरच पूर्ण होईल असा टोमणाही किरीट सोमय्यांनी लगावला होता.