राष्ट्रपती निवड, कलाम यांना विरोध

राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीसाठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. नावावर एकमत होत नसल्याने राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला विरोध जाहीर केल्याने राष्ट्रपती पदाची निवडीचे काय होणार, याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, ए. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या नावाला काहींनी विरोध दर्शवला आहे. तर हामिद अन्सारी यांच्या नावाला पसंती दिली आहे.

Updated: May 1, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com, नवी दिल्‍ली

राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीसाठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. नावावर एकमत होत नसल्याने राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला विरोध जाहीर केल्याने राष्ट्रपती पदाची निवडीचे काय होणार, याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, ए. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या नावाला काहींनी विरोध दर्शवला आहे. तर हामिद अन्सारी यांच्या नावाला पसंती दिली आहे.

भाजपच्‍या नेत्‍या सुषमा स्‍वराज यांनी कलाम यांच्‍या नावाला पाठींबा असल्‍याची भूमिका मांडली होती. कॉंग्रेसच्‍या कोणत्‍याही उमेदवाराला पाठींबा देणार नाही, असे स्‍पष्‍ट करतानांच त्‍यांनी प्रणव मुखर्जी आणि हामिद अन्‍सारी यांच्‍या नावाला विरोध केला होता. स्‍वराज यांच्‍या या वक्तव्‍यानंतर एनडीएमधुनच विरोध होत आहे. जनता दल (यू)चे नेते शरद यादव यांनी स्‍वराज यांची भूमिका ही भाजपची असून एनडीएने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

आता उमेदवारांच्‍या नावावरुन पक्षांतर्गत फुट पडल्‍याचे दिसुन येत आहे. तर हे मतभेद आघाड्यांमध्‍येही उफाळून आले आहेत. एनडीएमध्‍ये माजी राष्‍ट्रपती अब्‍दुल कलाम यांच्‍या नावरवरुन मतदभेद निर्माण झाले आहेत. तर युपीएमध्‍ये प्रणव मुखर्जी, हामिद अन्‍सारी यांच्‍यापैकी एका उमेदवाराच्‍या नावावर एकमत होऊ शकलेले नाही. यासंदर्भात एनडीएची एकही बैठक झालेली नसून राष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवाराबाबत चर्चा झाली नाही, असे यादव यांनी स्‍पष्‍ट केले. तर जेडीयूचे आणखी एक नेते नीतिश कुमार यांनीही काहीसी विरोधी भूमिका घेतली.

लालूप्रसाद यादव यांनी अंसारी यांचे नाव पुढे केले होते. परंतु, ते अद्याप या पदासाठी योग्‍य नसल्‍याचे स्‍वराज यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे भाजपकडून कलाम यांच्‍या नावाला युपीएच्‍या घटक पक्षांकडून पाठिंबा मिळविण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु आहेत.  राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी उपराष्‍ट्रपतींनाच राष्‍ट्रपती बनवा, अशी भूमिका घेतली आहे. समाजवादी पार्टीचे अध्‍यक्ष मुलायम सिंह यादव यांनी कलाम यांच्‍या नावाला अनुकुलता दर्शविलेली नाही. पक्षाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले