शांती भूषण यांना झाला दंड!

अलाहाबादमधल्या बंगल्याच्या खरेदी प्रकरणी त्यांनी एक कोटी ३२ लाखांची स्टँप ड्युटी चुकवली होती. त्यामुळे शांती भूषण यांना दंड भरावा लागणार आहे

Updated: Jan 6, 2012, 08:18 PM IST

www.24taas.com, अलाहबाद

 

टीम अण्णांचे सदस्य शांती भूषण यांना आलाहबादमधील बंगला खरेदी प्रकरणी स्टँप ड्युटी न चुकवल्यामुळे दंड भरावा लागणार आहे.

 

अलाहाबादमधल्या बंगल्याच्या खरेदी प्रकरणी त्यांनी एक कोटी ३२ लाखांची स्टँप ड्युटी चुकवली होती. त्यामुळे शांती भूषण यांना दंड भरावा लागणार आहे. स्टँप ड्युटीचे १ कोटी ३२ लाख आणि शिवाय दंडाचे सत्तावीस लाख अशी एकूण रक्कम त्यांना भरावी लागणार आहे. शांती भूषण हे सध्या भ्रष्टाचारविरोधात लढा देणाऱ्या टीम अण्णांचे सदस्य आहेत.

 

याहीआधी शांती भूषण आणि प्रशांत भूषण यांच्याविरोधात सीडी प्रकरणासारखे काही वाद समोर आले होते. तसंच शांती भूषण हे इंडिया अगेन्स्ट करप्शनशीही संबंधित आहेत. त्यामुळे त्यांनी स्टँप ड्युटी चुकवल्यानं या प्रकरणाला जास्त गंभीर वळण मिळालंय.