हक्कभंग नोटीशीला केजरीवाल यांचे उत्तर

संसदेच्या हक्कभंग नोटीशीला टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलंय. संसदेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक खासदार आहेत, या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदारांचा आम्ही आदर का करायचा, असा सवाल केजरीवाल यांनी केलाय.

Updated: Mar 30, 2012, 08:05 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

संसदेच्या हक्कभंग नोटीशीला टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलंय. संसदेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक खासदार आहेत, या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदारांचा आम्ही आदर का करायचा, असा सवाल केजरीवाल यांनी केलाय.

हे सांगतानाच त्यांनी मी संसदेचा कुठल्याही प्रकारे अपमान केला नसल्याचं केजरीवाल म्हणाले. संसदेत १६२ खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचा आरोप केजरीवाल यांनी पुन्हा एकदा केलाय. त्यामुळे सध्याची संसद ही गुन्हेगारांचा अड्डा असल्याच्या मतावर केजरीवाल ठाम असल्याचंच वाटतंय.

मोठमोठे उद्योगपती आणि राजकारणी यांचं साटंलोटं असल्याचा घणाघातही केजरीवाल यांनी केलाय. एरवी कुठल्याही सामाजिक कार्यात आढळून न येणारे उद्योगपती राजकीय पक्षांच्या मदतीनं संसदेत शिरकाव करत असल्याची टीकाही केजरीवाल यांनी केली आहे.

Tags: