बुमराहने विकेट्सची 'डबल सेंच्युरी' करत घडवला इतिहास, जे कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

Jasprit Bumrah 200 Wickets : टेस्ट क्रिकेटमध्ये 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट्स घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. 

पुजा पवार | Updated: Dec 29, 2024, 09:34 AM IST
बुमराहने विकेट्सची 'डबल सेंच्युरी' करत घडवला इतिहास, जे कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात रविवारी मेलबर्न येथे चौथ्या टेस्ट सामन्याच्या चौथा दिवस सुरु आहे. सुरु असलेल्या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स मिळवत इतिहास रचलाय. टेस्ट क्रिकेटमध्ये 31 वर्षीय जसप्रीत बुमराहने विकेट्सची डबल सेंच्युरी लगावली असून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेव्हिस हेडला दुसऱ्या इनिंगमध्ये बाद केल्यावर बुमराहने टेस्टमध्ये 200 विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला. टेस्ट क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते बुमराहने करून दाखवलं. टेस्ट क्रिकेटमध्ये 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट्स घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. 

मेलबर्न टेस्ट जिंकणं हे टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचं आहे. चौथ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी या दोघांनी चांगली पार्टनरशिप करून टीम इंडियाचा स्कोअर 350 पार पोहोचवला. ज्यामुळे दिवसाअंती ऑस्ट्रेलिया जवळपास 116 धावांनी आघाडीवर होती. भारताजवळ केवळ एक विकेट शिल्लक असल्याने चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांवर सर्वकाही अवलंबून होतं. अशावेळी बुमराह हा पुन्हा एकदा टीम इंडियाचा संकटमोचक ठरला आणि त्याला ऑस्ट्रेलियाच्या 4 दिग्गजांची विकेट घेण्यात यश आले. बॉक्सिंग डे टेस्टच्या चौथ्या दिवशी बुमराहने सॅम कोस्टांसची पहिली विकेट घेतली. त्यानंतर उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्शला देखील बाद करून कमाल केली. 

टेस्ट क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज : 

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये दुसरी विकेट घेतल्यावर टेस्ट फॉरमॅटमधील विकेट्सची डबलसेंच्युरी केली.  जसप्रीत बुमराहपूर्वी देखील काही गोलंदाजांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेतले आहेत पण त्यापैकी कोणालाही 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट्स घेणं शक्य झालं नव्हतं. बुमराहपूर्वी वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शलने 376 विकेट घेतल्या असून त्याची सरासरी 20.94 आहे. 

हेही वाचा :  Stupid, Stupid, Stupid..! खराब शॉट खेळून विकेट गमावल्यावर गावसकर पंतवर संतापले, Video व्हायरल

जसप्रीत बुमराहचा टेस्ट रेकॉर्ड : 

जसप्रीत बुमराह वयाच्या 31 व्या वर्षी त्याचा 44 वा टेस्ट सामना खेळत असून बुमराहने यात 200 विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. प्रत्येक विकेटसाठी 20 पेक्षा कमी धावा खर्च करणारा तो जगातील एकमेव गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज जोएल गार्नर याने 58 कसोटी सामन्यांमध्ये 20.97 च्या सरासरीने 259 बळी घेतले होते. 

भारतीय संघाची प्लेईंग 11 : 

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप