औरंगाबाद-कोल्हापूरमध्ये शिक्षकांचा पेपर तपासणीस नकार

शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात आज औरंगाबादमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. यावेळेस जिल्हाधिका-यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अन्यथा दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. आत्तापर्यंत 20 पेक्षा जास्त शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Updated: Feb 29, 2012, 12:23 AM IST

www.24taas.com, औरंगाबाद-कोल्हापूर

 

शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात आज औरंगाबादमध्ये शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. यावेळेस जिल्हाधिका-यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा अन्यथा दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. आत्तापर्यंत 20 पेक्षा जास्त शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, महसूल विभागाच्या या कारवाईवर शिक्षकांचा आक्षेप आहे. तसंच याविरोधात शिक्षक संघटना हायकोर्टात याचिका दाखल करणारेत.

 

कोल्हापूरमध्ये कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी बारावीचे पेपर्स तपासण्यास नकार दिलाय.कायम विना अनुदानितमधील कायम हा शब्द काढून टाकून अनुदान द्यावं अशी त्यांची मागणी आहे. पेपर तपासणार नाही असं कळविल्यानंतरही विभागीय बोर्डानं पेपर दिल्यानंतर सर्व शिक्षकांनी पेपर विभागीय मंडळात आणून टाकलेत. यामुळे पेपर तपासणीवर परिणाम होणारेए. मात्र, पर्यायी व्यवस्था करू आणि पेपर न तपासणा-यांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण मंडळानं दिलाय. मात्र, राज्यभरातील कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर न तपासण्याचा निर्णय घेतलाय.

Tags: