गँग रेप आरोपीची आई चालवित होती वेश्याव्यवसाय

औरंगाबादमधल्या बलात्कार प्रकरणानंतर धक्कादायक माहिती समोर येते आहे. निवृत्त DYSPची पत्नी जयश्री शर्मा कुंटणखाना चालवत असल्याची माहिती आहे. ती आणि तिचा मुलगा किशोर शर्मा कुंटणखाना चालवायचे अशी माहिती समोर आली आहे.

Updated: Jul 7, 2012, 01:39 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

औरंगाबादमधल्या बलात्कार प्रकरणानंतर धक्कादायक माहिती समोर येते आहे. निवृत्त DYSPची पत्नी जयश्री शर्मा कुंटणखाना चालवत असल्याची माहिती आहे. ती आणि तिचा मुलगा किशोर शर्मा कुंटणखाना चालवायचे अशी माहिती समोर आली आहे.

 

नागरिकांनी एक वर्ष आधीच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे कालचा बलात्कार हा सेक्स रॅकेटचा भाग याबाबत संशय निर्माण झाला आहे. बालसदनातील मुलींना गैरमार्गाला लावण्याचा धंदा जयश्री करत असल्याचा संशयही निर्माण झाला आहे.

 

औरंगाबादमध्ये झालेला गॅंगरेप हा खुद्द पोलिसाच्या मुलानेच केला असल्याचे स्पष्ट झाले होते. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यासमोर औरंगाबादच्या आश्रमातल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादाय खुलासा झाला होता. निवृत्त डीवायएसपी शर्मा यांचा मुलगा किशोर यानं आणि त्याच्या ३ मित्रांनी बलात्कार केल्याचं माहितीतून उघडं झालं होतं.

 

धक्कादायक गोष्ट ही की या चार आरोपींना बलात्कार करण्यासाठी आरोपीची आई आणि माजी पोलिस उपअधीक्षांच्या पत्नी जयश्री शर्मा यांनीच मदत केल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्यासोबत अनाथालयातल्या एका मुलीलाही अपहरणप्रकरणी मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार माजी पोलिस उपाधीक्षकांच्या घरात झाल्याचीही माहिती मिळत आहे.