डॉ. सुदाम मुंडेनी दिली पोलिसांनी तुरी

परळीतल्या स्त्री गर्भपात हत्येप्रकरणी फरार असलेला डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरले आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटलांनी मात्र पोलीस लवकरच मुंडेंना अटक करतील असा दावा केलाय. तर दुसरीकडं गोपीनाथ मुंडेंनीही डॉक्टर मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.

Updated: May 30, 2012, 03:49 PM IST

www.24taas.com, परळी

परळीतल्या स्त्री गर्भपात हत्येप्रकरणी फरार असलेला डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरले आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटलांनी मात्र पोलीस लवकरच मुंडेंना अटक करतील असा दावा केलाय. तर दुसरीकडं गोपीनाथ मुंडेंनीही डॉक्टर मुंडेंवर कारवाईची मागणी केली आहे.

परळीतील डॉ सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्या विरुध्द पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. परळी पोलीस स्थानिक पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी मुंडे कुटुंबीयांचे बँकेतील खाती गोठवली आहेत. एवढंच नाही तर परळी शहरा बाहेरील इतर बँकांतील व्यवहारही तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंडे कुटुंबातील व्यक्तींना बँकांतून पैसे काढता येणार नाही.

स्थावर मालमत्तेचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ नये यासाठी बीड इथल्या उपनिबंधकांना लेखी स्वरुपात सूचना दिल्या आहेत. परळी नगर परिषदेस मुंडे कुटुंबियांची स्थावर मालमतत्तेच्या संबंधी सर्व कागदपत्रासह माहिती देण्यासंबंधी माहिती देण्यासंबंधी लेखी स्वरुपात सूचना केल्या आहेत.