कापसाच्या प्रश्नावर उपोषण करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने सरकारची धावपळ सुरू झाली आहे.
कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आमदार राणांच्या भेटीला गेले आहेत. उपोषण मागे घेण्यासाठी सरकातर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. रवी राणा यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. कापसाच्या प्रश्नावर रवी राणा कायम असून ते मागण्यांवरही ठाम आहेत.
प्रकृती अधिकच खालावल्याने राणा यांना उपचारासाठी अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयातही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवल्याने पोलीस आणि आरोग्य प्रशासनासमारे मोठा पेच निर्माण झाला होता.