झी २४ तास वेब टीम, उल्हासनगर
गुरूनानक जंयती निमित्ती आज उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभात फेरी काढण्यात आली होती. कधी नव्हे ते उल्हासनगर मधील नागरिक इतक्या सकाळी उठून प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले होते. उल्हासनगर मध्ये मोठ्या प्रमाणात शीख आणि सिंधी बांधव असल्याने या गुरूनानक जंयती अत्यंत उत्साहात साजरी केली जाते.
आज उल्हासनगरमध्ये गुरुनानाक जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त निघालेल्या शोभा यात्रेमध्ये एक लाख भक्त सहभागी झाले होते. यावेळी थायीरासिंग गुरुद्वारावर तसंच शहरभर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. गुरुनानक जयंतीच्या 13 दिवस आधी हा उत्सव साजरा करायला सुरुवात होते. 12 दिवस विविध गुरुद्वारामधून भजन आणि मंत्र गात प्रभात फेऱ्या निघतात आणि तेराव्या दिवशी मोठी शोभा यात्रा निघते. आज पहाटे 4 पासून निघालेल्या शोभायात्रेमुळे उल्हासनगरमधले सर्व रस्ते फुलून गेले होते. यावेळी विविध चित्ररथ, भजन मंडळी, डान्स ग्रुप यांनी शोभायात्रेचा आनंद वाढवला.