ठाण्यात राष्ट्रवादी १३ जागांवर विजय

ठाण्यात शिवसेनेचे सभागृह नेते पांडूरंग पाटील पराभूत झाले आहेत. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार अनिता गौरी विजयी झाल्या आहेत. ठाण्यात मिलिंद पाटणकर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या भरत चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला आहे.

Updated: Feb 17, 2012, 12:17 PM IST

www.24taas.com, ठाणे

ठाण्यात शिवसेनेचे सभागृह नेते पांडूरंग पाटील पराभूत झाले आहेत. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार अनिता गौरी विजयी झाल्या आहेत. ठाण्यात मिलिंद पाटणकर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या भरत चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीला १२ जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे वॉर्ड क्रमांक ५१ मधील उमेदवार लक्ष्मण टिकमानी विजयी झाले आहेत.

ठाण्यात ४४ ब मध्ये महेश साळवी आणि अनिता साळवी विजयी झाले आहेत.

Tags: