पवनराजे हत्या प्रकरणात साक्षीदारांना सुरक्षा

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांवर येत असलेला दबाव आणि त्यांना मिळत असलेल्या धमक्या पाहता त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश हायकोर्टानं सीबीआयला दिले आहेत.

Updated: Mar 30, 2012, 10:03 PM IST

www.24taas.com, अलिबाग

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील साक्षीदारांवर येत असलेला दबाव आणि त्यांना मिळत असलेल्या धमक्या पाहता त्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश हायकोर्टानं सीबीआयला दिले आहेत.

या हत्या प्रकरणात असलेले मुख्य आरोपी खासदार पद्मसिंह पाटील हे राजकारणातील प्रभावशाली आणि वजनदार नेते आहेत, त्यामुळं साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत अलिबागहून मुंबईला खटला हलवण्याची याचिका पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी हायकोर्टात केली होती.

त्यावर न्यायमूर्ती आर. सी चव्हाण यांनी, खटला दुसरीकडं चालवण्यामुळं काहीही फरक पडणार नाही,उलट न्यायाला उशीर होईल. संशयित मुख्य आरोपींचे प्रभावशील व्यक्तिमत्व पाहता सीबीआय़नं साक्षीदारांना सुरक्षा पुरवावी, असे निर्देश न्यायालयाने दिलेत.