सागरी सुरक्षेचे तीनतेरा

मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सागरी मार्गानं आले होते. मात्र यातूनही प्रशासनानं धडा घेतलेला नाही. सागरी सुरक्षिततेबाबत सुरक्षा यंत्रणा किती सजग आहे याचा प्रत्यय वारंवार येतोय. विरारजवळचा अर्नाळा समुद्रकिनारा म्हणजे याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलं आहे.

Updated: Apr 4, 2012, 09:14 AM IST

www.24taas.com, विरार

मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सागरी मार्गानं आले होते. मात्र यातूनही प्रशासनानं धडा घेतलेला नाही. सागरी सुरक्षिततेबाबत सुरक्षा यंत्रणा किती सजग आहे याचा प्रत्यय वारंवार येतोय. विरारजवळचा अर्नाळा समुद्रकिनारा म्हणजे याचं मूर्तीमंत उदाहरण ठरलं आहे.

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षाव्यवस्थेचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. समुद्राच्या जवळच आगाशी पोलीस दूरक्षेत्र आहे. मात्र या दूरक्षेत्राला टाळं लागलं आहे. अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत वॉचटॉवरवरून कर्मचारी खेळण्यातली दुर्बीण घेऊन टेहाळणी करत होते मात्र या दुर्बीणीच्या एका बाजूचं झाकणच बंद होतं.

तर सुमद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पोलिसांच्या गाडीचा एका बाजूचा टायर फाटलेला आढळला. एकूणच हा सगळा प्रकार पाहिल्यनंतर खरोखर आपली सागरी सुरक्षा किती बळकट आहे हे स्पष्ट होतं. याबाबत पोलीस अधिक्षकांकडे विचारणा केली असता त्यांनी तोंडदेखलं चौकशीचं आश्वासन दिलं आहे.