झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई
नवी मुंबई शहरात मंगळवारी सगळ्याच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होते. कारण कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या वाहनचालकांना वेतन वेळेवर मिळावं या मागणीसाठी त्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता पण त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना बसला.
नवी मुंबईतल्या अनेक रस्त्यांवरचा कचरा उचललाच गेला नाही. रस्त्यांवर कचऱ्याचे ढीगच ढीग पसरले होते आणि कचऱ्यामुळे दुर्गंधीही सुटली होती. अपुरं वेतन, समानवेतन नाही, सार्वजनिक सुट्टी नाही यामुळे कर्मचाऱ्यांमधे असंतोष पसरला होता. म्हणुन वाहनचालकांनी वाशी,सानपाडा,नेरुळ,बेलापूर याविभागात गाड्या चालवल्या नाहीत.