www.24taas.com, नागपूर
नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येतोय. तब्बल २८ तासांच्या या मेगाब्लॉकला आज दुपारी १२.०० वाजता सुरुवात होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या वाहतुकीच्या सिग्नल यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची योजना मध्य रेल्वेनं आखलीय. १९७८ पासूनची ही सिग्नल यंत्रणा असल्यानं ती बदलणं आवश्यक असल्यामुळे मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या मेगाब्लॉकचा एकुण २६ गाड्यांवर परिणाम होणार आहे. हा मेगा ब्लॉक २८ तासांसाठी असेल. उद्या, म्हणजेच १३ जूनला पहाटे ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील.
.