नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन

नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनासाठी स्थानिक शेतक-यांची मोठी गर्दी झालीये. भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतीत उपयोगी पडतील अशी यंत्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. भारतातील शेतीच्या कक्षा रुंदावण्यासाठी शेतक-यांना नवी दृष्टी देणार आंतरराष्ट्रीय कृषिप्रदर्शन नाशिकमध्ये भरवण्यात आलं आहे.

Updated: Dec 5, 2011, 03:13 PM IST

झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरे

नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रदर्शनासाठी स्थानिक शेतक-यांची मोठी गर्दी झालीये. भारतातील आणि महाराष्ट्रातील शेतीत उपयोगी पडतील अशी यंत्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. भारतातील शेतीच्या कक्षा रुंदावण्यासाठी शेतक-यांना नवी दृष्टी देणार आंतरराष्ट्रीय कृषिप्रदर्शन नाशिकमध्ये भरवण्यात आलं आहे.

या प्रदर्शनात शेतिपयोगी अवजारं आणि यंत्र मांडण्यात आलीयेत. शिवाय नवीन शेतीच्या तंत्रांची माहितीही शेतक-यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलीये. नांगरणी, कापणी, मशागत आणि फवारणी अशी बहुपयोगी कामं करणारा टॅक्टरही प्रदर्शनात पहायला मिळतोय. अनेक जागतिक पातळीवरच्या कृषि उत्पादक कंपन्यांनी आपली उत्पादनं या प्रदर्शनात मांडलीयेत.

प्रदर्शनात मांडलेली नवनवीन यंत्रामुळं निर्माण झालेलं कुतूहल शेतक-यांच्या तोंडावर स्पष्टपणं दिसतयं. मुख्य बाब म्हणजे स्थानिक शेतक-यांना सहज वापरता येतील अशी ही यंत्र असल्याचं सांगण्यात येतयं. पाच डिसेंबरपर्यंत या प्रदर्शनाला शेतक-यांना भेट देता येणार आहे. आत्तापर्यंत या प्रदर्शनाला लाखो शेतक-यांनी भेट दिली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.