'समुद्रातील' मुंबई 'खड्ड्यात' घातली- आबा

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध चांगलंच रंगत चाललं आहे. आधी पवार आणि ठाकरे वाद यामुळे वादाला सुरवात होताच प्रत्येकांने यात उडी मारली.

Updated: Dec 4, 2011, 06:31 AM IST

झी २४ तास वेब टीम, जळगाव

 

राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध चांगलंच रंगत चाललं आहे. आधी पवार आणि ठाकरे वाद यामुळे वादाला सुरवात होताच प्रत्येकांने यात उडी मारली. आता तर मात्र खुद्द गृहमंत्र्यांनीच या वादामध्ये उडी घेतली आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना हे आबांना कश्याप्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सेनेवर टीका केली. यावेळी मनसेला मात्र आबांनी वेगळ्याच पद्धतीनं डिवचलं. परप्रांतीयांना मुंबईतून हाकलण्यामध्ये खऱ्या अर्थानं मनसेपेक्षा शिवसेनेलाच अधिक श्रेय जातं असा टोला त्यांनी लगावला. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात आर. आर. पाटील यांची सभा पार पडली. यावेळी आबांनी आपल्या भाषणात सेना मनसेलाच लक्ष्य बनवलं. दरम्यान मुंबई ही समुद्रसपाटीपासून वर होती असा भौगोलिक दाखला देत आता शिवसेनेनं मात्र मुंबई खड्ड्यात लोटल्याची टीकाही आबांनी यावेळी केली.