साई संस्थानाच्या विश्वस्तांची उधळपट्टी

शिर्डीतील साई संस्थानच्या तिजोरीचा अध्यक्ष-विश्वस्त आणि कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनच गैरवापर होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संस्थानच्या विश्वस्तांनी मोबाईल बिलावर हजारो रुपयांची उधळपट्टी केल्याचं उघडकीस आलंय.

Updated: Apr 12, 2012, 02:45 PM IST

www.24taas.com, शिर्डी

शिर्डीतील साई संस्थानच्या तिजोरीचा अध्यक्ष-विश्वस्त आणि कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनच गैरवापर होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संस्थानच्या विश्वस्तांनी मोबाईल बिलावर हजारो रुपयांची उधळपट्टी केल्याचं उघडकीस आलंय.

संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष जयंत ससाने यांचं एका महिन्याचं बिल तब्बल ३३ हजार रुपये आहे तर माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी ७ वर्षात ६ मोबाईलची खरेदी संस्थानच्या तिजोरीच्या पैशातून केल्याचं उघडकीस आलंय. तर कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांचं एका महिन्याचं बिल तब्बल ५३ हजार एवढं आहे. हा सर्व खर्च संस्थानच्या तिजोरीतून करण्यात आलाय.

संस्थानच्या विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी वाहनांवर तसंच इतरत्रही मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरवापर केल्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. एकूणच संस्थानच्या विश्वस्तांचा हा कारभार संतापजनक असल्याची टीका होतेय.