आ.प्रकाश शेंडगेंचा भाजपला रामराम

आ.प्रकाश शेंडगेंनी भाजपला रामराम केला आहे. शेंडगेंनी पक्षात डावललं जात असल्याच्या कारणावरुन नाराजीने प्रदेश सरचिटणीसपदासह तीन पदांचा राजीनामा दिला होता. आ.प्रकाश शेंडगे हे गोपीनाथ मुंडे समर्थक आहेत. तसंच भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं.

Updated: Jan 9, 2012, 07:28 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

आ.प्रकाश शेंडगेंनी भाजपला रामराम केला आहे. शेंडगेंनी पक्षात डावललं जात असल्याच्या कारणावरुन नाराजीने 23 डिसेंबरला प्रदेश सरचिटणीसपदासह तीन पदांचा राजीनामा दिला होता. त्याआधी शेंडगे यांनी १६ डिसेंबरला वरिष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. दरम्यान आ.प्रकाश शेंडगे काँग्रसेच्या वाटेवर आहेत असं वृत्त आहे. तसंच शेंडगेंना प्रवेश देण्यास काँग्रेस अनुकूल असल्याचंही समजतं. आ.प्रकाश शेंडगे हे गोपीनाथ मुंडे समर्थक आहेत. तसंच भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं.

 

प्रकाश शेंडगे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं कि राजीनामा देऊन १८ दिवस झाल्यानंतर देखील पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली नाही. यासंदर्भात पक्षाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोललो तसंच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी देखील कळवलं. तसंच सध्या कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या संपर्कात नसल्याचंही ते म्हणाले.

 

भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोपही आ.प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. प्रकाश शेंडगे यांनी पक्षातील ओबीसी नेते नाराज असल्याचं सांगत नेतृत्वावर कडाडून हल्लाच चढवला आहे.

 

 [jwplayer mediaid="26172"]