सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहिल्यानंतर या जगात आता माणुसकी उरली आहे की नाही असा प्रश्न पडतो. यामध्ये अनेकदा कौटुंबिक हिंसाचाराचे व्हिडीओ असतात ज्यामध्ये पती, पत्नी, लहान मूल किंवा वयस्कर आई-वडिलांवर अत्याचार होताना दिसत असतात. छत्तीसगडच्या रायपूरमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.
घरात बाळाचा जन्म झाला की आई-वडिलांपेक्षाही जास्त आनंद आजी-आजोबांना होत असतो. त्यांच्यासाठी नातू म्हणजे पुन्हा एकदा आई-वडील होण्याचा अनुभव असतो. नातवाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा ते क्षण जगता येतात. पण जेव्हा तोच नातू मोठा झाल्यावर हात उगारतो तेव्हा होणाऱ्या वेदनाही कदाचित तेवढ्याच गंभीर असतात, असाच काहीसा प्रकार छत्तीसगडमध्ये झाला आहे. येथे एका तरुणाने आपल्या वयस्कर आजीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. तरुण आपल्या आजीला घराच्या बाहेर चपला आणि बॅटने मारहाण करताना दिसला. मारहाण केल्यानंतर तो घऱात जाताना दिसत आहे.
नातू आजीला मारहाण करत असताना शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीय आणि आरोपी नातू घराला कुलूप लावून फरार झाले आहेत. अमरपुरी परिसरात ही घटना घडली आहे.
माणुसकीला काळी फासणाऱ्या अशा अनेक घटना याआधीही समोर आल्या आहेत. एक महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात एका सुनेने आपल्या सासूला मारहाण करत हत्या केली होती. सासू आणि सुनेत नेहमी वाद होत होते. कौटुंबिक वादातून अखेर सुनेने सासूची हत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसंच सूनेला अटक केली आहे. सासू नेहमी सूनेला छोट्या गोष्टींवरुन ओरडत असे. यामुळेच संतापलेल्या सूनेने सासूची हत्या केली.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.