कोर्ट काय शिक्षा सुनावणार बलात्कारीना???

पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु आहे.

Updated: Mar 19, 2012, 07:37 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु आहे.

या खटल्यात आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना आता उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरी या २५ वर्षांच्या तरुणीची १ नोव्हेंबर २००७ला बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. हिंजवडीतल्या विप्रो कंपनीत ज्योती काम करत होती. नाईट शिफ्टला जाण्यासाठी निघालेली ज्योती रात्री दहाच्या सुमारास कॅबमध्ये बसली होती.

मात्र, कॅब कंपनीकडे नेण्याऐवजी कॅबचा ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेनं ज्योतीकुमारीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर निर्जनस्थळी नेलं. आणि तिच्यावर बलाकार करुन तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी कौशल्यानं तपास करत कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेला अटक केली आहे. हा खटला पुणे सत्र न्यायालयात सुरु आहे. आरोपींना खून आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.