तहानलेल्या पुण्यात पाणीगळती सुरूच!

येत्या काही दिवसात पुणेकरांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. असं असतानाही पुण्यातली पाणी गळती थांबवण्यात पुणे महानगरपालिका अपयशी ठरतेय

Updated: May 27, 2012, 11:15 PM IST

www.24taas.com, पुणे

 

येत्या काही दिवसात पुणेकरांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. असं असतानाही पुण्यातली पाणी गळती थांबवण्यात पुणे महानगरपालिका अपयशी ठरतेय. पुण्यातल्या मॉडेल कॉलनीत गेली कित्येक दिवस पाणी गळती होतेय. पण वारंवार तक्रार करूनही याबाबत महापालिका काही उपाय योजना करताना दिसत नाही.

 

पुण्यात भीषण पाणी टंचाई असताना धो-धो वाहणारं पाणी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, पुण्याच्या मॉडेल कॉलनीत हे चित्र तुम्हाला हमखास दिसेल. खडकवासला धरणातलं पाणी कमी होत असताना पुणेकरांना येत्या काही दिवसात भीषणपाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. पण, दूसरीकडे पुण्यात जागोजागी पाणी वाया जातानाही दिसून येईल. विशेष म्हणजे, या बाबतीत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेचे अधिकारी या बाबतीत काहीही उपाययोजना करत नसल्यामुळे नागरिक संतप्त झालेत.

 

पुणेकारांना सध्या दिवसातून ठराविक काळच पाणी पुरवठा होतो. काही भागात तर अनेकदा तर पाणीही येत नाही. बऱ्याच भागात टँकरने पाणी पुरवठा होतोय. पण दूसरीकडे महापालिकेच्या गलथान कारभारामुळे पाणी गळती मात्र थांबत नाही. पाण्याची एवढी गंभीर समस्या असताना अधिकारी मात्र यावर कारवाई करत नाहीत.