नाही करणार काँग्रेसविरोधी प्रचार, अण्णांची माघार

पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये अण्णा काँग्रेसविरोधी प्रचार करणार होते असं त्यांनी जाहीर केलं होतं. पण आज किरण बेदी यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर अण्णा हे काँग्रेस विरोधी प्रचार करणार नाहीत असे किरण बेदी यांनी जाहीर केले.

Updated: Jan 5, 2012, 12:06 PM IST

www.24taas.com, पुणे

 

लोकपालच्या मुद्यावकरून सरकार आणि अण्णा यांच्यात गेले काही दिवस चांगलीच जुंपली होती. त्यामुळे पाच राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये अण्णा काँग्रेसविरोधी प्रचार करणार होते असं त्यांनी जाहीर केलं होतं. पण आज किरण बेदी यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर अण्णा हे काँग्रेस विरोधी प्रचार करणार नाहीत असे किरण बेदी यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकपाल आंदोलनाचा पुढे कसा प्रचार केला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

प्रकृती अस्वास्थामुळे अण्णा पाच विधानसभा निवडणूकीत प्रचार करणार नसल्याची माहिती टिम अण्णांच्या सदस्या किरण बेदी यानी दिली आहे. अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची आज किरण बेदी यानी पुण्यात जाऊन विचारपुस केली. यावेळी अण्णा याना विश्रांतीची गरज असल्याचे किरण बेदींनी स्पष्ट केलं

 

तसचं अण्णा पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होणार नसल्याची बेदीनी माहीती दिली आहे. शनिवारी दिल्लीत टिम अण्णांच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. याही बैठकीत अण्णा सहभागी होणार नाही.