निप्पाणीजवळ अपघातात १० ठार

कोल्हापूरकडून बेळगावच्या दिशेनं येणा-या टोयोटा फॉर्च्युनर गाडीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात दोन कुटुंबातील दहा जण ठार झाले. पुणे-बंगळुरू हायवेवर निपाणीजवळ ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला.

Updated: May 31, 2012, 08:31 PM IST

www.24taas.com, निपाणी

कोल्हापूरकडून बेळगावच्या दिशेनं येणा-या टोयोटा फॉर्च्युनर गाडीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात दोन कुटुंबातील दहा जण ठार झाले. पुणे-बंगळुरू हायवेवर निपाणीजवळ ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला.

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात राहणारे पेडणेकर आणि पालेकर कुटुंबीय शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन कोल्हापूर-बेळगाव मार्गे घरी परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला. गाडीचा पुढचा टायर फुटल्यानं गाडी डिव्हायडर ओलांडून दुस-या बाजूला घसरत गेली. त्याचवेळी समोरून येणारा भरधाव टेम्पो गाडीवर धडकल्याचे निपाणी पोलिसांनी सांगितले. गाडीचा वेग ताशी १२० ते १४० किलोमीटर असल्यानंच ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.

 

 

या अपघातात टोयोटा गाडीचा चालक उज्ज्वल पालेकर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 


मृतांची नावं-

अनिता पालेकर (२०), प्रकाश पालेकर (४५), रवी पेडणेकर (३१), गणेश पेडणेकर (२२), अथर्व पेडणेकर (४), नीता पालेकर (२०), प्रजय पालेकर (१४), नारायण पालेकर (१८), प्रज्ञेश पालेकर (१२), पूनम पालेकर (४०).